Breking News
पर्वती परिसरात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलानवले पूल परिसरात आंदोलनाला बंदीकात्रज–कोंढवा मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी प्राधान्यहडपसरमध्ये बेड्यासह आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसलाभिंतीत अडकलेल्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुटकाकोथरूडमध्ये दूरसंचार विभागाची केबल चोरीलापुणे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल स्वरुपात दिशादर्शक काम करावेभारतातील पहिल्या ‘ईआरपी प्रदर्शनाचे ७ ते ९ मे कालावधीत पुण्यात आयोजनटेम्पो चोरणार्‍या सराईतांना अटक, युनीट सहाची कामगिरीजुन्या वादातून तरूणाचा केला खून, चार अल्पवयीन ताब्यात

सहकारनगर पोलीस ठाण्यात तोडफोड, गुंडाविरुद्ध आणखी एक गुन्हा

तरुणीचा पाठलाग करुन काकाला जिवे मारण्याची धमकी

marathinews24.com

पुणे – सहकारनगर पोलीस ठाण्यात गोंधळ घालून तोडफोड करणारा गुंड ऋषीकेश उर्फ बारक्या संजय लोंढे याच्याविरुद्ध पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. पद्मावती भागातील तळजाई वसाहतीत दहशत असलेला ऋषीकेश लोंढे (वय २२) याच्यासह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. मोक्का कारवाई केल्यानंतर त्याने न्यायालयाकडून जामीन मिळविला. कारागृहातून जामीन मिळवून बाहेर आलेल्या लोंढेने पु्न्हा गुन्हे करण्यास सुरुवात केली.

प्रधानमंत्री धन-धान्य योजनेअंतर्गत १०० जिल्ह्यामध्ये सहभाग – सविस्तर बातमी

आरोपी लोंढेने १७ जुलैला तरुणीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला होता. तसेच लोंढेने तरुणीच्या काकाला धमकाविले होते. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १९ वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.लोंढेने तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. तरुणी एका ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. त्यावेळी त्याने तिला रस्त्यात अडविले. तरुणीने तिच्या काकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी लोंढेने ब्युटीपार्लर चालक महिलेला ब्युटीपार्लरची तोडफोड करण्याची धमकी दिली होती. काकासोबत घरी जात असताना त्याने तरुणीसह तिच्या काकाला धमकाविल्याचे तरुणीने फिर्यादीत नमूद केले आहे.

विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांचे पथक लाेंढेला ताब्यात घेण्यासाठी तळजाई वसाहतीत गेले. त्यावेळी त्याने पोलिसांच्या चेहऱ्यावर पेपर स्प्रे मारुन पसार होण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला पकडूनन पहाटे पोलीस ठाण्यात आाणले. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यातील काचेवर बेडी आपटली. बेडी आपटल्यानंतर त्याच्या हाताला दुखापत झाली. पोलिसांच्या अंगावर धावून त्याने जिवे मारण्याची धमकी दिली.

त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस ठाण्यात तोडफोड केल्याप्रकरणी लोंढे आणि त्याचा भाऊ जितेंद्र उर्फ मोन्या याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैद्यकीय तपासणीसाठी दोघांना ससून रुग्णालायत आणले होते. तेव्हा त्याचा भाऊ पोलिसांची नजर चुकवून पसार झाला. त्याला पर्वती दर्शन परिसरातून रात्री ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याप्रकरणी मोन्या याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×