पुण्यात किराणा व्यावसायिकाची १२ लाखांची रोकड चोरीला…

आरोपीला छत्रपती संभाजी नगरातून बेड्या; चार वर्षांपासून होता पसार, खडकी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – किराणा माल विक्रेत्या व्यावसायिकाचा विश्वास संपादित केल्यानंतर त्यांनी बँकेत भरण्यासाठी दिलेल तब्बल १२ लाख २७ हजारांची रोकड चोरून नेणार्‍या कामगाराला खडकी पोलिसांनी अटक केली. मागील चार वर्षांपासून आरोपी हा ठिकठिकाणची घरे बदलून राहत होता. रावसाहेब शहराम कराळे (वय ५२, रा. धामणगाव, देवीचे, पाथर्डी, अहिल्यानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बाबुराम भैय्याराम अग्रवाल (वय ६०) यांनी फिर्याद दाखल केली होती. ही घटना मे २०२१ मध्ये खडकी परिसरात घडली होती.

सहकारनगर पोलीस ठाण्यात तोडफोड, गुंडाविरुद्ध आणखी एक गुन्हा – सविस्तर बातमी

तक्रारदार अग्रवाल हे किराणा माल विक्रीचे व्यावसायिक असून, त्यांच्याकडे आरोपी रावसाहेब कराळे २०२१ सालापासून कामाला होता. त्यामुळे मालकाचा त्याचा विश्वास बसला होता. मे २०२१ मध्ये अग्रवाल यांनी त्याच्याकडे १२ लाख २७ हजारांची रोकड बँकेत जमा करण्यासाठी दिली होती. मोठ्या प्रमाणावर रोकड असल्याची संधी साधून आरोपी कराळे हा दुचाकीसह पसार झाला होता. याप्रकाराची माहिती मिळताच खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीने आपली ओळख लपवत वारंवार ठिकाणी बदलली. पोलिसांना दिशाभूल करीत तो चार वर्षे तीन महिने फरार होता. दरम्यान, आरोपी कराळेच्या कुटूंबातील लोकांनीच तक्रारदाराविरूद्ध अपहरणाचा बनावट गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता.

अगरवाल यांचा प्रचंड मानसिक त्रास झाला होता. याप्रकरणी त्यांनी नुकतीच पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांची भेट घेउन न्याय देण्याची मागणी केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बागवे, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास वेगाने केला. पोलीस अमलदार अनिकेत भोसले यांच्या तांत्रिक माहितीसह सुधाकर रोठोड, गालीब मुल्ला, शशांक डोंगरे यांच्या गोपनीय माहितीनुसार आरोपी कराळे याला छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात घेत अटक केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी विठ्ठल दबडे उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, शशीकांत सपकाळ, रुषीकेश दिघे, दिनेश भोये, शशांक डोंगरे, प्रताप केदारी, प्रविण गव्हाणे, शिवराज खेड यांनी केली.

किराणा माल विक्रेत्या मालकाचा विश्वास संपादित झाल्यानंतर त्यांनी बँकेत जमा करण्यासाठी दिलेले तब्बल १२ लाख २७ हजारांची रोकड घेउन चार वर्षे पसार झालेल्या आरोपीला छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात घेत अटक केली आहे. दिग्विजय चौगले, पोलीस उपनिरीक्षक, खडकी पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×