पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

पत्रिका पाहण्याच्या बहाण्याने ज्योतिषाने केला तरुणीचा विनयभंग

marathinews24.com

पुणे– भावाच्या जन्म पत्रिकेवर तोडगा सांगण्याच्या बहाण्याने ज्योतिषाने तरुणीला मिठी मारून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सहकारनगर भागात घडली आहे. आरोपी ज्योतिषीने तरूणीला वनस्पती देण्याची बतावणी करुन कार्यालयात बोलावले होते. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आरोपी ज्योतिषाला अटक करण्यात आली आहे. अखिलेश लक्ष्मण राजगुरू (वय ४५) असे अटक केलेल्या ज्योतिषीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पुण्यात किराणा व्यावसायिकाची १२ लाखांची रोकड चोरीला, – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीुसार, पीडित तरुणीने तिच्या मोठ्या भावाची जन्मपत्रिका दाखवण्यासाठी आरोपी ज्योतिषीची भेट घेतली होती. त्यावेळी राजगुरूने पत्रिका पाहून भावाच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी विशेष वनस्पतीची आवश्यकता असल्याची बतावणी केली होती. शनिवारी (१९ जुलै) तरुणीला वनस्पती घेण्यासाठी कार्यालयात या, असा संदेश पाठवून त्याने तरूणीला बोलावून घेतले. पीडित तरुणी पुणे-सातारा रस्त्यावरील त्याच्या कार्यालयात गेली. आरोपी राजगुरुने वनस्पती देण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग केला. घाबरलेल्या तरूणीने भावाला घटनेची माहिती देउन सहकारनगर पोलीस ठाणे गाठले. सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी राजगुरू याला अटक केली.

कोरेगाव पार्क भागात भोंदूला अटक

उच्चभ्रु समजल्या जाणार्‍या कोरेगाव पार्क भागात भोंदूला नुकतीच अटक करण्यात आली होती. सोन्याचा हंडा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने महिलेकडून अडीच लाख रुपये उकळले होते. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी भोंदूला अटक केली होती. तक्रारदार महिला कोथरूड भागात राहायला आहे. उदरनिर्वाहासाठी ती घरकाम करत होती. भोंदूने महिलेला सोन्याचा हंडा देण्याचे आमिष दाखविले होते. त्याने महिलेला एक मडके दिले होते. मडक्यात माती भरून दिली, तसेच त्याल लाल कापड लावले. पंधरा दिवसांनी मडके उघडून पाहा, असे त्याने महिलेला सांगितले होते. महिलेने मडके उघडून पाहिल्यानंतर त्यात माती आढळून आली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली होती.

तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधित ज्योतिषाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा रस्त्यावर आरोपी ज्योतिषी राजगुरुचे कार्यालय असून, त्याल अटक करण्यात केली असून, याप्रकरणाचा तपास सुरू आहे. – राहुल गौड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×