सायबर चोरट्यांकडून १ कोटी ११ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून १ कोटी ११ लाखांची फसवणूक

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम असून, सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने तब्ब्ल १ कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यासह कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लोणी काळभोर भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८८ लाख ३४ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ४७ वर्षीय तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लोणी काळभोर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर फेब्रुवारी महिन्यात संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना सुरुवातीला परतावा देण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी रकम गुंतविली. रकम गुंतविल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही, तसेच परतावाही देण्यात आला नाही.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक निकम तपास करत आहेत.

दुसर्‍या घटनेत कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २२ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत. दरम्यान, शहरात दिवसेंदिवस सायबर चोरट्यांकडून लुटमार केली जात असून, पोलिसांकडून तपासाला गती दिली जात नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. बहुतांश गुन्ह्यातील आरोपी उत्तर भारतातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी त्यांना अटकाव करीत न्याय मिळवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×