Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

फसवणूकीबद्दल शारदा महिला मंडळ रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द

प्रत्यक्ष व पुस्तकी शिल्लक धान्यसाठा यात आढळली तफावत

marathinews24.com

पुणे – शहरातील मार्केटयार्ड भागात शारदा महिला मंडळाच्या नावाने रास्त भाव दुकानाचा परवाना सुरू होता. सदर परवाना श्रीकृष्ण पांडुरंग ननावरे नावाची व्यक्ती कोणत्याही परवानगीशिवाय चालवत असल्याचे परिमंडळ अधिकारी अमोल हाडे यांनी तपासणी केल्यावर आढळून आले.

राज्य उत्पादन शुल्क पथकाची पुरंदर तालुक्यात छापेमारी – सविस्तर बातमी

तसेच तपासणी दरम्यान हाडे यांना रास्त भाव दुकानात अनेक गंभीर दोष आढळून आले जसे की रास्त भाव दुकान शासन निर्धारित वेळेत बंद ठेवणे, महिला मंडळाचे दुकान इतर व्यक्तीने चालवणे, रास्त भाव दुकानात शासनाने नेमून दिलेले दप्तर न ठेवणे, रास्त भाव दुकानातील तराजू व वजने प्रमाणित नसणे, शिधापत्रिकाधारकांशी अरेराविपणे बोलणे व धमकावणे तसेच तपासणी वेळी प्रत्यक्ष व पुस्तकी शिल्लक धान्यसाठा यात तफावत आढळून येणे असे दोष आढळल्याने प्रशांत खताळ अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी शारदा महिला मंडळ रास्त भाव दुकान परवाना क्रमांक ह 31 कायमस्वरूपी रद्द केला.

शारदा महिला मंडळ सद्यस्थितीत अस्तित्वात आहे का याची खातर जमा करण्यात येत आहे. दुकानातील आढळून आलेल्या दोषांच्या तपासणी दरम्यान तफावत आढळून आलेल्या धान्याच्या दंडाची रक्कम रु 33 हजार 666 वसूल करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. तसेच सर्व परिमंडळ कार्यालयातील सहकारी संस्था व महिला बचत गटामार्फत चालवण्यात येणाऱ्या दुकानांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचनाही खताळ यांनी दिल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×