Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बालेवाडी, पाषाण, सुस येथे महारक्तदान शिबिर संपन्न

१०१४ युनिट रक्त संकलित

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्राचे लाडके व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कोथरूड विधानसभा उत्तर मंडळाच्या वतीने “महारक्तदान संकल्प” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकाच दिवशी तब्बल १०१४ रक्त युनिट्स संकलित करण्यात आले, ही एक उल्लेखनीय सामाजिक कामगिरी ठरली.

‘आम्ही मुळशीकर’ प्रतिष्ठानच्यावतीने “शाब्बास” गुणगौरव सोहळ्याचे आयोजन – सविस्तर बातमी

या उपक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूड मतदारसंघाचे आमदार मा. चंद्रकांतदादा पाटील तसेच पुण्याचे खासदार मा. मुरलीधर मोहोळ यांनी विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.

या यशाबद्दल भाजपा कोथरूड उत्तर मंडळ अध्यक्ष लहू गजानन बालवडकर यांनी सर्व रक्तदात्यांचे, स्वयंसेवकांचे आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानले. ‘सेवा हाच धर्म’ या तत्त्वाला कृतीत उतरवत आपण हजारो गरजू रुग्णांसाठी जीवनदान दिले. हे केवळ रक्तदान नसून, जबाबदारी, माणुसकी आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले.

https://marathinews24.com/shabbas-appreciation-ceremony-organized-by-ami-mulshikar-foundation/

या शिबिराचे उद्घाटन भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते पार पडले.भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे व महिला मोर्चा शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांनीही विशेष उपस्थिती लावली.

या यशस्वी आयोजनासाठी भाजप कोथरूड उत्तर मंडळातील अनेक पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यामध्ये माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सरचिटणीस गणेश कळमकर, पुनीत जोशी, राघवेंद्र बापू मानकर, रविंद्र साळेगावकर, सुशिल मेंगडे, सचिन पाषाणकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर, अस्मिता करंदीकर, अनिकेत चांदेरे, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, शिवम सुतार, सचिन सुतार, प्रमोद कांबळे, सुशिल सरकाटे, सुभाष भोळ, लखन कळमकर, डॉ. आनंद जराड, नवनाथ ववले, काळुराम गायकवाड, चंद्रकांत जाधव, अमोल पाटील, अर्थव देवरे, शरद भोते, सुहास भोते, शिवम बालवडकर, कबीर कदम यांचा समावेश होता.

महिला पदाधिकारी उमा गाडगीळ, वैदही बापट, प्रियंका पेंडसे, कल्याणी टोकेकर, निकिता माथाडे, जागृती विचारे, मृणाल गायकवाड, स्मृती जैन, मीना पारगावकर, सुजाता धनकुडे, स्नेहल चौगुले, वैशाली कमाजदार, प्राजक्ता देवस्थळी, विजया चांदोलकर, मोसंबी बकोरे, सविता जाधव, रेखा कश्यप, पायल मुरकूटे, प्रगती निसाळ, अर्चना देशपांडे, राणी मोहिते, मानषी कांबळे आदी मान्यवर देखील उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संस्थांचा महत्त्वपूर्ण सहभाग लाभला असून, आयोजकांनी सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×