महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची उपस्थिती
marathinews24.com
पुणे – तब्बल ५ महिलांनी घेतला-बांगड्या अन मेहंदीचा आनंद – महाराष्ट्राची संस्कृती जपत आपले सण-उत्सव अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि सातत्याने त्यांचे जतन व्हावे, याकरिता पुण्यामध्ये श्रावण मासानिमित्त नागपंचमिचे औचित्य साधून ५ हजार महिलांनी बांगड्याा भरणे आणि मेहंदी काढण्याचा आनंद लुटला. कार्यक्रमाला महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी उपस्थिती लावत बांगड्याा भरुन मेहंदी काढली. तसेच फुगडी खेळण्यात महिलांसोबत सहभाग घेतला होता. प्रल्हाद गवळी मित्र परिवार तर्फे कसबा पेठेतील आर.सी.एम. गुजराथी हायस्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अॅप आधारित रिक्षा-टॅक्सी-सेवेच्या निर्णयाचे स्वागत- डॉ. बाबा कांबळे – सविस्तर बातमी
महिला जिल्हाध्यक्षा सुशीला नेटके, पुणे कॅन्टाॅन्मेंट विभाग अध्यक्ष अजय कदम, मनविसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ, साईनाथ चकोर, बाळासाहेब देवळे, विक्रम लगड, जीवन गायकवाड, नरेष देवकर, हेमंत कंठाळे, आयोजक प्रल्हाद गवळी उपस्थित होते. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष होते. अगदी पाच-सहा वर्षाच्या चिमुकलीपासून ते ऐंशी वर्षाच्या आजीपर्यंत सर्वच वयोगटातील महिलांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. निलीमा रासने व त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी उपक्रमाला विशेष सहकार्य केले.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, मंगळागौरीचे खेळ, बांगडया, मेहंदी, टिकल्या, सिंदूर हे पाहून श्रावणात साजरे होणारे सण आणि जुने दिवस यानिमित्ताने पुन्हा एकदा आल्यासारखे वाटत आहे. महिलांना आनंद देण्याचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. महिलांकरिता असे कार्यक्रम सातत्याने व्हायला हवेत.
प्रल्हाद गवळी म्हणाले, सर्वसामान्य महिला चूल आणि मुल यासोबतच आपले कुटुंब याभोवती बहुतांश वेळ असतात. त्यांना वेगळ्या प्रकारचा आनंद देता यावा आणि सर्व वयोगटातील, क्षेत्रातील महिलांनी एकत्र यावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपले सण आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न यानिमित्ताने आम्ही करीत आहोत. महिलांना मंगळागौरीचे खेळ पाहण्यासोबतच बांगड्याा भरणे, मेहंदी काढणे आणि टिकलीचे पाकिट, सिंदूर देखील देण्यात आले.






















