Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

“लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदे फाउंडेशनकडून हजारो वाचकांना ‘साहित्य भेट’..!”

एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने एक अत्यंत प्रेरणादायी आणि लोकाभिमुख उपक्रम आयोजित

marathinews24.com

पुणे – समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांचा बुलंद आवाज असलेले लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीचे औचित्य साधत एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने एक अत्यंत प्रेरणादायी आणि लोकाभिमुख उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या मौलिक साहित्य संपदेतील निवडक पुस्तकांच्या हजारो प्रती “साहित्य भेट” म्हणून उपस्थित नागरिक, विद्यार्थी, महिला आणि वाचकांना मोफत देण्यात आल्या.

पद्मश्री डॉ. शंकर महादेवन यांनी गायलेले “बाप्पा मोरया” गाणं लाँच – सविस्तर बातमी 

कार्यक्रमाच्या प्रमुख स्थळी, सारसबागेजवळ उभारण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हजारो अभिवादकांनी मानवंदना देतांना अण्णाभाऊंच्या विचारांची शिदोरी घेऊन आलेल्या विविध वयोगटातील नागरिकांनी “साहित्य भेट” उपक्रमाचा मोठ्या उत्साहाने लाभ घेतला. या ग्रंथांमध्ये फकीरा, अण्णाभाऊ साठे समग्र विचारदर्शन, साहित्यसम्राट, अण्णाभाऊ साठे एक विद्यापीठ आणि इतर प्रेरणादायी साहित्यसंपदेचा समावेश होता,या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या नामदार डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी अण्णाभाऊंच्या लेखनाचे सामाजिक मूल्य अधोरेखित करत या उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले.

"लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदे फाउंडेशनकडून हजारो वाचकांना 'साहित्य भेट'..!"

या अनोख्या उपक्रमाचे आयोजक शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारांनी समाजातील दीनदलित, वंचित, श्रमिक घटकांना न्याय आणि ओळख मिळवून दिली. त्यांचे साहित्य आजही वर्तमान समाजाला दिशा दाखवणारे आहे. नव्या पिढीने अण्णाभाऊंच्या साहित्याचा अभ्यास करून आपली वैचारिक समृद्धी साधावी, हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे.”
याचप्रमाणे, कार्यक्रमाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने उपस्थित सर्व अभिवादकांसाठी चहापानाचेही आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे संपूर्ण कार्यक्रमाचा भावनिक आणि सामाजिक प्रभाव पुन्हा अधोरेखित झाला, या उपक्रमाला शिवसेनेचे पुणे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना व सर्व अंगीकृत संघटनांच्या सदस्यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×