पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला..

पीएमपीएल बसमध्ये जेष्ठ महिलेची सोन्याची बांगडी लंपास..

Marathinews24.com

पुणे -पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी एका जेष्ठ महिलेच्या हातातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याची बांगडी कापून नेली. ही घटना २ एप्रिलला संध्याकाळी पाच ते पावणेसहाच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी हिंगणे खुर्द परिसरात राहणार्‍या ६९ वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस असल्याचे भासवत नागरिकांची करत होता लूट – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला हिंगणे खुर्द परिसरात राहायला असून, २ एप्रिलला संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पीएमपीएल बसने प्रवास करीत होत्या. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील ७० हजारांची सोन्याची बांगडी कापून नेली. काही वेळानंतर महिलेला हातात सोन्याची बांगडी नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी खडक पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तपास करीत आहेत.

मनोरंजन

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top