Breking News
बीडीपी आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलावित – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेशहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाडराज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्तमातंग समाजाच्या स्वागताध्यक्षपदी लक्ष्मीताई पवार…एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची फसवणूकCrime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खूनCrime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देशपिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृती

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा

मंत्री गिरीश महाजन यांनी सायंकाळी भेट देऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा घेतला आढावा

marathinews24.com

पुणे – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या ठिकाणी राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी भेट देऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.

महिलांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी 

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उप विभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.

इंदोरी गावाजवळील कुंडमळा इंद्रायणी नदीवरील पुल कोसळलेल्या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली, त्यानंतर माध्यमांशी बोलतांना  महाजन म्हणाले, इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या कुटुंबीयांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमी व्यक्तींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली.

घटनास्थळी एनडीआरएफ पथक, आपदा मित्र, पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएचे अग्निशमन दल व स्थानिक मदत बचाव संस्था आदी घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. नागरिकांना वाचविण्यासाठी स्थानिकांनी मोठ्याप्रमाणात मदत केली आहे. घडलेल्या घटनेची चौकशी केली जाईल.

घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटनेबाबत शासन सतर्क असून यापुढे पर्यटकांनी खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन श्री. महाजन यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार या घटनेतील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top