Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

फ्लॅटचे कुलूप तोडून ३९ लाखांचा ऐवज लांबविला

फ्लॅटचे कुलूप तोडून ३९ लाखांचा ऐवज लांबविला

हडपसर भागातील घटना 

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ३८ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तरुणाच्या डोक्यात दगड मारून खून – कात्रजजवळील जांभुळवाडी तलाव परिसरातील घटना – सविस्तर बातमी 

तक्रारदार महिला आणि कुटुंबीय हडपसर परिसरातील वैभव चित्रपटगृह परिसरात असलेल्या सेजल गार्डन सोसायटीत राहायला आहेत. शनिवारी सायंकाळी फ्लॅट बंद करुन कुटुंबीय बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाटातून सोन्याचे दागिने, हिरेजडीत दागिने, रोकड असा ३८ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने रविवारी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक जौंजाळ तपास करत आहेत.

बंडगार्डन रस्त्यावरील नारंगीबाग परिसरातील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. याबाबत ज्येष्ठ महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला नारंगीबाग परिसरातील नित्यानंद काॅम्प्लेक्स सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार जढर तपास करत आहेत.

मार्केटयार्ड भागताील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी परदेशी चलन, ६५ हजारांचे दागिने, मोबाइल असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील गणात्रा काॅम्प्लेक्स सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाटातून परदेशी चलन, दागिने, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक आवारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×