Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

आरटीओ ट्राफिक चलनाच्या नावाखाली लुटले ७ लाख

आरटीओ ट्राफिक चलनाच्या नावाखाली लुटले ७ लाख

सायबर चोरट्यांकडून महिलेला ऑनलाईन गंडा

marathinews24.com

पुणे – आरटीओ ट्राफिक चलनाची फाईल पाठवित सायबर चोरट्यांनी महिलेला क्लिक करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांचे व्हॉटसअ‍ॅप आपोआप रद्द झाले. सायबर चोरट्यांनी महिलेचा मोबाइलचा ऑनलाईनरित्या ताबा घेउन ७ लाख रूपये स्वतःच्या बँकखात्यात वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. ही घटना २१ मे रोजी आंबेगावातील जांभुळवाडी रस्ता परिसरात घडली आहे. याप्रकरणी अमृता गुरव (वय ३३ रा. जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकासह बँक खातेधारकावर गुन्हा दाखल केला आहे.

फ्लॅटचे कुलूप तोडून ३९ लाखांचा ऐवज लांबविला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार अमृता गुरव कुटूंबियासह आंबेगावमध्ये राहायला असून, २१ मे रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर आरटीओ ट्राफिक चलन ५०० अशी एपीके फाईल पाठविली. अमृताने फाईल उघडल्यानंतर लगेचच त्यांचे व्हॉटसअ‍ॅप अचाकनपणे अनइन्स्टॉल झाले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेच्या फोनचा ताबा घेत ऑनलाईनरित्या बँकखात्यातून तब्बल ७ लाख रूपये वर्ग करून घेतले. बँक खात्यातील रक्कम कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर अमृताला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी तातडीने आंबेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक गजानन चोरमले तपास करीत आहेत.

अनोळखी लिंक, मेसेज पाहू नका-पुणे सायबर पोलीस

नागरिकांनो अज्ञाताकडून तुमच्या व्हॉटसअ‍ॅप मेसेजवर अनेकवेळा अनोळखी लिंक, मेसेज पाठविले जातात. संबंधित मेसेजस साबयर चोरट्यांकडून पाठविल्याची दाट शक्यता असते. विशेषतः ट्राफिक चलन, वीज कनेक्शन तोडण्याची धमकी, लॉटरीसह विविध प्रकारचे आमिष दाखवून तुम्हाला जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न सायबर चोरट्यांकडून केला जातो. त्यानंतर एपीके फाईल पाठवित तुमच्या मोबाइलचा ताबा घेउन ऑनलाईनरित्या बँकखाते रिकामे केले जाते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींच्या मेसेजला उत्तर देणे, लिंक उघडून पाहणे फसवणूकीच्या जाळ्यात स्वतःहून अडकल्यासारखे आहे. त्यामुळे अनोळखी लिंक, मेसेज न पाहण्याचे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×