जुनी सांगवी येथील पवना नगरमधील घटना
marathinews24.com
पिंपरी : जुनी सांगवी येथील पवना नगरमधील नटराज अपार्टमेंट इमारतीमध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत जिन्याखाली लावण्यात आलेले बारा मीटर जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
मॅफेड्रॉन तस्कराला बेड्या, १२ लाखांचे एमडी जप्त – सविस्तर बातमी
आगीबाबत स्थानिक रहिवासी राजू सावळे यांनी अग्नीशमन विभागाला संपर्क करून घटनेची माहिती दिली. काही वेळातच रहाटणी, वल्लभनगर येथील अग्नीशमन दलाची दोन वाहने घटनास्थळी दाखल झाली. यादरम्यान आगीने रौद्ररूप धारण केल्याने इमारतीतील सर्व सदस्य भयभीत होऊन रस्त्यावर आले होते. सांगवी पोलिसही घटनास्थळी उपस्थित होते.
महावितरणनेही माहिती मिळताच वीज खंडित केली. यावेळी अग्नीशमन विभागाच्या जवानांनी तत्परता दाखवत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत येथील बारा मीटर जळून खाक झाले होते. यावेळी सोसायटीच्या पार्किंग मधील चारचाकी वाहने, दुचाकी वाहने काढण्यात आली होती.