Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

अशासकीय उदघाटनासाठी बांधलेल्या स्टेजसाठी कायदेशीर कारवाई होणार का-अरविंद शिंदे

अशासकीय उदघाटनासाठी बांधलेल्या स्टेजसाठी कायदेशीर कारवाई होणार का-अरविंद शिंदे

श्रेयाच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने मोर्चा

marathinews24.com

पुणे – चिखलवाडीतील प्रभाग क्रमांक आठमध्ये ३ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचा मुद्दा सध्या मोठ्या राजकीय गदारोळाचे कारण ठरत आहे. ज्या पाण्याच्या टाकीसाठी सामान्य नागरिक गेली चार महिने तहानले होते, त्या टाकीच्या उद्घाटनावरून आता श्रेय घेण्याची चढाओढ सुरु आहे. श्रेयाच्या निषेधार्थ आज काँग्रेसच्यावतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरचिटणीस शरद रणपिसे, राजेंद्र भुतडा, रमेश पवळे, सेल्वराज अँथोनी, नंदलाल धिवार, ज्योती परदेशी सह 100 ते 150 महिला सहभागी झाले होते. औंध रोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून चिखलवाडी टाकी पर्यंत कॉग्रेसचवतीने मोर्चाकाडून घोषणाबाजी करित जल जन आंदोलन करून नारिकांसाठी पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले.

पुण्यातील टिळक रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्याचा निर्णय – सविस्तर बातमी 

पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनासाठी महानगरपालिकाकडून कोणताही प्रस्ताव नाही. तर प्रशासनाकडून सांगण्यात येते की माजी सदस्यांनी घेतलेला हा अशासकीय आहे. मग मनपाच्या जागेत अनाधिकृत मंडप बांधून कार्यक्रम केला जात आहे. आयुक्त अशा अनाधिकृत मंडप बांधून अशासकीय कार्यक्रम घेणाऱ्यांवर कारवाई करणार का असा सवाल अरविंद शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्तांना विचारला आहे.

टाकीचे काम पूर्णच झालेले नाही, तेव्हा उद्घाटन कोणत्या आधारावर? अनधिकृत उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री व आमदार सहभागी होणार का?अशा कार्यक्रमावर कारवाई कोण करणार? असा आरोप ही विनोद रणपिसे यांनी केला आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्टपाण्याच्या टाकीचा लाभ जनतेला मिळावा म्हणून काँग्रेसने वृद्ध नागरिकांच्या हस्ते उद्घाटन केले. तहन, राजकीय मार्केटिग पाण्याचा प्रश्‍न जिथे लोकांच्या जगण्याशी निगडीत आहे, तिथे काही माजी नगरसेवक हे केवळ स्वतःचे राजकीय मार्केटिंग आणि श्रेय घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून उद्घाटनाचा घाट घालत आहेत. नगरसेवक नाहीत, तरीही उद्घाटनात झेंडे आणि चेहरे!प्रशासन म्हणते टाकी अपूर्ण, पण काहीजण म्हणतात उद्घाटन करायचं!हे माजी नगरसेवक आज नगरसेवक नाहीत, पण मालक असल्यासारखे वागत आहे, असा आरोप केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×