Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

पुण्यातील टिळक रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्याचा निर्णय

रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी निर्णय

marathinews24.com

पुणे – शहरातील टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकातून सहभागी होणाऱ्या मंडळांनी पाच तासांत, तसेच पूरम चौकातून सहभागी होणाऱ्या मंडळाने चार तासांत मिरवणूक संपवावी, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.
टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत शहरातील वेगवेगळ्या भागातून मंडळे सहभागी होतात.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाची आढावा बैठक संपन्न – सविस्तर बातमी

मध्य भागातील मंडळांसह दक्षिण पुण्यातील मंडळे टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. देशभक्त जेधे चौक आणि टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता. या दोन्ही चौकातून २०६ मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. विसर्जन मार्गावरील दोन्ही प्रमुख चौकात गर्दी असते. त्यामुळे मंडळांना मुख्य मिरवणूक मार्गावर सहभागी होताना विलंब होतो. यंदा विसर्जन मिरवणुकीची सांगता लवकर करण्याच्या दृष्टीने टिळक रस्ता गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक समितीने निर्णय घेतला आहे.

टिळक रस्ता गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम, खडक पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, तसेच साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते, नेहरू तरुण मंडळाचे पुष्कर तुळजापूरकर, दर्शन मित्र मंडळाचे गणेश घोष, सत्यवीर मित्र मंडळाचे उमेश वैद्य, सुभाषनगर माडीवाले कॉलनी मित्र मंडळाचे विनायक धारणे, एकता मित्र मंडळाचे सुरेश ढमाले, शिवदर्शन मित्र मंडळाचे अमित बागुल, अचानक मित्र मंडळाचे ऋषिकेश भुजबळ आदी उपस्थित होते.

टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत यंदा एक ते दोन पथकांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे. विसर्जनाच्या दिवशी या रस्त्यावर विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून गाड्या लावण्यात येतात. खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी अंतर्गत रस्त्यावर व्यवसाय करावेत. करण्यात येणार आहे. यंदा विसर्जन मिरवणूक रात्री बारापूर्वी संपविण्यााच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

जेधे, पूरम चौकात ध्वनीवर्धक, वादनास मनाई

टिळक रस्त्यावरील जेधे चौक, तसेच पूरम चौकात गर्दी असते. या दाेन्ही चौकातून मंडळे विसर्जन मार्गावर सहभागी होतात. या चौकात मंडळांना थांबावे लागते. त्यामुळे यंदा या दोन्ही चौकात ढोल-ताशा पथकांचे वादन आणि ध्वनीवर्धकांचा वापर करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×