Breking News
AI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर

राखी पौर्णिमेला भावाला जिवे मारण्याची धमकी; विवाहितेची आत्महत्या

Pune Crime News

आंबेगाव बुद्रुक परिसरातील घटना; पतीसह ७ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – राखी पौर्णिमेला भावाला बोलविल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याने उच्चशिक्षित विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक भागात घडली. तरुणीचा शारिरिक आणि मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन भारती विद्यापीठ पोलिसांकडून पतीसह सासरकडील नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्नेहा विशाल झेंडगे (वय २७, रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे.

कोयते लपविण्यासाठी आईची साथ- आई सहआरोपी; चार कोयते जप्त – सविस्तर बातमी 

याबाबत स्नेहा यांचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय ५५, रा. कर्देहळी, जि. सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि विशाल यांचा विवाह गेल्या वर्षी २ मे २०२४ रोजी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच सासरकडील मंडळींनी कंपनी चालविण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैशांसाठी तिच्यामागे तगादा लावण्यात आला. पैशांसाठी स्नेहाला वारंवार शिवीगाळ,तसेच मारहाण केली होता. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला.

छळ असह्य झाल्याने स्नेहाने पतीसह नातेवाईकांविरुद्ध यापूर्वी पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, सासरे संजय झेंडगे यांचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ याने तिला दमदाटी करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते. तक्रार मागे घेतल्यानंतरही स्नेहाचा छळ सुरू होता.राखी पौर्णिमेला भावाला बोलाविल्यास त्याला जिवे मारू, अशी धमकी तिला देण्यात आली होती. छळ असह्य झाल्याने स्नेहाने शनिवारी (९ ऑगस्ट) रात्री अकराच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आतम्हत्या केली, असे स्नेहाचे वडील कैलास सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×