Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

आजच्या महिलांनी जिजामातांची भूमिका बजावण्याची गरज!

आजच्या महिलांनी जिजामातांची भूमिका बजावण्याची गरज!

‘झाल’ उपक्रमातील माहेरवाशिणींचा एकत्रिकरण सोहळा संपन्न

marathinews24.com

पुणे – नवीन पीढि संस्कारक्षम घडविण्यासाठी महिलांनी जिजामातांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पीढिवर संस्कार केले पाहिजेत. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिमागे महिला भक्कम उभी राहते, त्यामुळेच तो पुरुष यशस्वी होतो, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

ताराचंद रूग्णालयाची गरिब आणि गरजू रूग्णांप्रती कटिबध्दता कायम- गोपाळ राठी – सविस्तर बातमी 

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये राबविण्यात आलेल्या ‘झाल’ उपक्रमातील माहेरवाशिण महिलांचा एकत्रिकरण सोहळा आशिष गार्डन येथे संपन्न झाला. यावेळी उद्योजिका स्मिता पाटील, माजी नगरसेविका आणि भाजपा मध्य मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हर्षाली माथवड, माजी नगरसेविका अँड वासंती जाधव, छाया मारणे, डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आजच्या महिलांनी जिजामातांची भूमिका बजावण्याची गरज!

ना. पाटील म्हणाले की, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यामुळे शिवाजी महाराज घडले आणि त्यांनी हिंदवी साम्राज्य उभा केलं. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिमागे महिला भक्कम उभी राहते, त्यामुळेच तो पुरुष यशस्वी होतो. त्यामुळे नवीन पीढि संस्कारक्षम घडविण्यासाठी महिलांनी जिजामातांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पीढिवर संस्कार केले पाहिजेत.

ते पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रमाणेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श समाज निर्माण करण्यासाठी मंदिरांची पुनरबांधणी केली. त्याशिवाय त्यांचा राज्य कारभार इतका आदर्श होता की, त्यांनी आजही त्यातील काही मूल्ये ही दीशादर्शक आहेत. त्यांच्यासोबतच, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, सावित्रीमाई फुले, महाराणी ताराराणी यांसारख्या अनेक महिलांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यामुळे तसाच आदर्श आजच्या महिलांनी उभा करावा, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला कोथरुडमधील अनेक माहिला आणि रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या झाल उपक्रमातील अनेक नववधू उपस्थित होत्या. त्यापैकी काहींनी ना. पाटील यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×