Breking News
Traffic Rules Pune : वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी सहकार्य करा- रवींद्र आहेररावPurandar Airport Project : पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा;उच्च न्यायालयाने याचिका फेटाळलीबळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर

कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराची आत्महत्या

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात एकाला अटक

बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक

marathinews24.com

पुणे – कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराची आत्महत्या – कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. ठेकेदाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चंदर पिराजी माेहिते (वय ५६, रा. विनय सागर आर्केड, त्रिमूर्ती चौकाजवळ, भारती विद्यापीठ परिसर) असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत मोहिते यांची पत्नी शकुंतला (वय ५६) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसायिक संतोष चोरगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वारगेट परिसरात प्रवाशांकडील ऐवज लंपास – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदर मोहिते हे गृहप्रकल्पातील रंगकामाचा ठेका घेतात. आरोपी बांधकाम व्यावसायिक चोरगे हे मोहिते यांच्या ओळखीचे होते. चोरगे यांनी त्यांना तीन गृहप्रकल्पात रंगकाम करण्याचे काम दिले हाेते. या कामाच्या बदल्यात चोरगे यांनी माेहिते यांना एक सदनिका आणि साडेदहा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. मोहिते यांनी परिचितांकडून हातऊसने पैसे घेऊन तीन गृहप्रकल्पाचे रंगकाम पूर्ण केले होते. व्यवहारात ठरल्यानुसार चोरगे यांनी मोहिते यांना पैसे, तसेच सदनिका देण्याचे मान्य केेले होते. मोहिते यांनी रंगकामाचे पैसे मागितले. तेव्हा चोरगे यांनी माेहिते यांना जातीवाचक शिवीगाळ केली. शिवीगाळ,तसेच फसवणूक केल्याने मोहिते यांनी ९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री कात्रज घाटातील अन्विषा लाॅजमागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, असे मोहिते यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक आवारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×