Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

‘गोंधळ एक कुलाचार’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

'गोंधळ एक कुलाचार' पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमाती विकास संघातर्फे रविवारी (ता. १७) पुस्तक प्रकाशन व सत्कार समारंभ

marathinews24.com

पुणे – गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमाती विकास संघातर्फे पुस्तक प्रकाशन, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. येत्या रविवारी (ता. १७) सकाळी ११.३० वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर, पुणे येथे हा समारंभ होणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष परेश गरुड यांनी दिली.

पुण्यातील वाहतूककोंडीवर नव्या तंत्रज्ञानाचा उतारा – सविस्तर बातमी 

हरीश पाचंगे लिखित, वेदांतश्री प्रकाशन प्रकाशित ‘गोंधळ एक कुलाचार’ या पुस्तकाचे प्रकाशन, पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. व्यंकप्पा सुगतेकर यांचा सत्कार व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे, तर ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. लोककलेचे अभ्यासक डॉ. भावार्थजी देखणे, अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास केंद्राचे संचालक सतीश मोटे, प्रकाशक सुनील उंब्रजकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

परेश गरुड म्हणाले, “संस्थेमार्फत गेल्या आठ वर्षांपासून गोंधळ प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. त्यामध्ये ‘संबळ’ वाद्याचे, विविध गाणी व गायनाचे धडे दिले जातात. पुढील पिढीला या कलेचे ज्ञान अवगत व्हावे, या उद्देशाने मयूर शेळके यांच्या संकल्पनेतून व साहाय्यातून हरीश पाचंगे यांनी ‘गोंधळ एक कुलाचार’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. अनेक वर्षांपासून ही कला जपत लोकांपर्यंत घेऊन जाणाऱ्या डॉ. व्यंकप्पा सुगतेकर यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार, तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.”

कार्यक्रमाला विश्वस्त मंडळातील शिरीष खडके, पवन अटक, रमेश उबाळे, हरीश पाचंगे, चंदन अटक, उत्तमराव वाघमोडे, बलराज काटे, ज्ञानेश्वर बडगे, ऍड. मुकुंद यदमळ, प्रसाद पवार, किशोर बॅबे, प्रमोद काटे, अशोक वरडे आदी उपस्थित राहणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×