महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पद्मावती भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहकारनगर पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा छापा टाकला. या कारवाईत भारतीय जनता पक्षाच्या पर्वती मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांसह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशीरा महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्यातील वाहतूककोंडीवर नव्या तंत्रज्ञानाचा उतारा – सविस्तर बातमी
पद्मावती भागात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांच्या पथकाला सोमावारी रात्री मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसंनी भारतीय जनता पक्षाच्या पर्वती विधानसमा मतदारसंघाचे सरचिटणीस ओैंदुबर कांबळे याच्यासह पाच ते सहा जणांना पत्ते खेळताना पकडले. पोलिसांनी तेथून पत्ते, रोकड, तसेच अन्य साहित्य जप्त केले. जुगार अड्ड्यावर भाजपच्या पर्वती मतदारसंघातील पदाधिकाऱ्याला पकडल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. रात्री उशीरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती सहकारनगर पोलिसांनी दिली.
मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चौकात मटक्चाची चिठ्ठी घेणाऱ्या एकाला खडकी पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून मटक्याच्या आकड्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी जाॅन पॅट्रीक जोसेफ (वय ४९, रा. नीता अपार्टमेंट, खडकी ) याच्याविरुद्ध गु्नहा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार अमजद शेख यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार रेंगडे तपास करत आहेत.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मारुती टक्केवार (रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस शिपाई सूरज कुंभार यांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार दडस तपास करत आहेत. वारजे माळवाडी भागात जुागर अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी बाळू धोंडिबा गडसिंग (वय ५५), लक्ष्मण गोरख तरंगे (वय ३६, दोघे रा. दांगट इस्टेट, शिवणे) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.
पोलीस शिपाई सुनील मुठे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक लुगडे तपास करत आहेत. शहरातील जुगार अड्डे, मटका अड्ड्यांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. जुगार अड्डा चालविणारे अनेक जण सराइत आहेत. कारवाई केल्यानंतर पु्नहा छुप्या पद्धतीने जुगार अड्डे चालवित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपनगरात जुगार अड्डे मोठ्या प्रमाणावर चालविले जातात.
कात्रजमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणींना पकडले – विशेष पथकाची कारवाई
पुणे– कात्रजमधील सुखसागरनगर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणींंना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. मुसम्मद सोनी अब्दुल समद खातून (वय २२), मोनीरा बेगम (वय १९, दोघी मूळ रा. गुजिया, जि. बोगारा, बांगलादेश ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
पोलीस कर्मचारी अमाोल घावटे, प्रफुल्ल मोरे यांना याबाबतची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने दोघींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडे बांगलादेशातील ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र सापडले. दोघी घुसखोरी करुन भारतात आल्याची माहिती मिळाली आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस कर्मचारी राजेंद्र नलावडे, कानिफनाथ कारखेले, अमोल घावटे, गणेश थोरात, प्रफुल्ल मोरे, भरत गुंडवाड, गणेश माने, सर्जेराव सरगर, शिवाजी सातपुते, शीतल जमदाडे, नेहा तापकीर यांनी ही कारवाई केली.
बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आल्यानंतर आतापर्यंत आठ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून बांगलदोशी नागरिकांची मायदेशी रवानगी करण्यात येणार आहे.























