Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

ससूनमधील मावशी, दायी, सफाई कर्मचाऱ्यांचा मीरा देशपांडे सेवा पुरस्काराने गौरव

नर्सिंगच्या चार विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचेही वाटप

marathinews24.com

पुणे – सिटी ग्रुप ॲमानोरा येस्स फौंडेशनतर्फे ससून सर्वोपचार रुग्णालयातील सहा मावशी, दायी, सफाई महिला कर्मचाऱ्यांचा मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्काराने तर ससून, बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंगच्या चार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

विधानिक तत्वांचे पालन केले तर स्वातंत्र्य अबाधित राहील – विद्यार्थी महोत्सवातून संदेश – सविस्तर बातमी

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ससून रुग्णालयातील महात्मा गांधी सभागृहात बुधवारी (दि. 15) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मल्लपा जाधव, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. किणीकर, सीईओ मगर, प्रशासकीय अधिकारी डॉ. आवटे, मेट्रन विमल केदार, सिटी ग्रुपचे चिफ सोशल ऑफिसर विवेक कुलकर्णी उपस्थित होते.

सिटी ग्रुपचे चिफ सोशल ऑफिसर विवेक कुलकर्णी यांनी उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, सिटी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिरुद्ध देशपांडे यांच्या मातोश्री मीरा देशपांडे यांचे ससून रुग्णालयातील नर्सिंग महाविद्यालयातच शिक्षण झाले होते तर वडिल डॉ. प्रद्युम्न देशपांडे हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. मीरा देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या आठ वर्षांपासून रुग्णालयातील मावशी, दायी, सफाई महिला कर्मचाऱ्यांना मीरा देशपांडे स्मृती सेवा पुरस्काराने गौरविण्यात येते. तसेच परिचारिका अभ्यासक्रमातील विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सामाजिक बांधिलकी, सेवा आणि कृतज्ञतेच्या भावनेतून हा उपक्रम राबविला जातो.

चांदणी अमित चव्हाण, कलावती सोपान कांबळे, पूनम प्रमोद सुसगोहेर, त्रिवेणी गौतम सोनवणे, संगीता सनी सोलंकी, हेमा गालफाडे या सफाई कर्मचाऱ्यांचा शाल, साडी, स्मृतीचिन्ह, अकरा हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला. तर सना खान, इन्सिया सय्यद, साक्षी तिरमाने, क्षितीजा मोरे या विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र, पंधार हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव आणि शिष्यवृत्ती वाटप रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या हस्ते झाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×