Breking News
पुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकपुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळतीपर्वती गावात दोघांवर शस्त्राने वारखाण्याच्या पानात भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांचा वापरड्रग मुक्त पुणे जनजागृती अभियानाचा शुभारंभजिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावी

पेट्रोल पंप मॅनेजरने मालकाला अडीच कोटी रुपयाला चुना…

तब्बल अडीच कोटी रूपयांचा केला अपहार,  ऑडीटमध्ये अपहार  झाला उघड

Marathinews24.com

पुणे- पेट्रोल पंपावर मॅनेजर असलेल्या एकाने व्यवहार गोलमाल करीत पंप  मालकाला तब्बल  २ कोटी ६३ लाख १५ हजार ९४२ रुपयांचा  गंडा घातला आहे. इंधन विक्रीतून नफाच होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पंप मालकाने ऑडीट केले. त्यानंतर व्यवहार आर्थिक घोळ  झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नितीन रामचंद्र रायपुरे (वय ५२, मॅनेजर, रा.घोरपडेवस्ती लोणीकाळभोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   अक्षय बाळकृष्ण काळे (वय ३६, रा.मगरपट्टा सिटी हडपसर) यांनी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अक्षय काळे यांचा कुंजीरवाडीत  अ‍ॅटोकॉर्नर पेट्रोल पंप आहे.  पंपावर मागील काही वर्षांपासून  आरोपी नितीन रायपुरे   मॅनेजर म्हणून काम पाहत होता. यापुर्वी हा पंप काळेंचे वडील पाहत होते. आरोपी रायपुरे १५ वर्षापासून त्यांच्या पंपावर मॅनेजर म्हणून कार्यरत होता. त्यामुळे रायपुरे याच्यावर काळे कुटूंबियांचा विश्वास होता. काही दिवसांपुर्वी तक्रारदार काळे यांच्या वडीलांचा मृत्यू झाल्यामुळे पंपाचा कारभार त्यांनी स्वतःकडे घेतला. त्यावेळी पंपावरून इंधनाची विक्री तर होतेय, मात्र पैसे कोठे जातात हे समजत नव्हते. त्यामुळे त्यांनी व्यवहाराचे  ऑडीट करून घेतले असता, त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

२ कोटी ६३ लाख १५ हजारांचा गंडा

पंपावरून इंधन विक्री केलेले पैसे आरोपी रायपुरे हा  स्वतःच्या बँक खात्यात वर्ग घेत असल्याचे निदर्शनास आले. २०१८ ते मार्च २०२४ याकालावधीत  त्याने  २ कोटी ६३ लाख १५ हजार ९४२ रुपयांचा गंडा घातला. फसवणूकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रारदार काळे यांनी  लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.  तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर पोलिसांनी मॅनेजर रायपुरे विरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×