Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात सायबर चोरट्यांकडून ६७ लाखांची फसवणूक

पुण्यात सायबर चोरट्यांकडून ६७ लाखांची फसवणूक

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र कायम आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष, तसेच घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाचे आमिष दाखवून चोरट्यांनी ६७ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वारजे आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून वारजे माळवाडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची १८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत ज्येष्ठाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोंढव्यात टोळक्याची दहशत; वाहनांची केली तोडफोड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारादारांच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात संदेश पाठविला होता. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले. प्रत्यक्षात त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे तपास करत आहेत.

अशाच पद्धतीने विश्रांतवाडी भागातील एकाची सायबर चोरट्यांनी ३७ लाख १६ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे तपास करत आहेत. ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी विश्रांतवाडी भागातील एका तरुणाची १० लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केली. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तरुणाला सुरुवातीला परताव्यापोटी काही रक्कम दिली. त्यानंतर तरुणाला पैसे गुंतविण्यास सांगितले. तरुणाकडून पैसे घेतल्यानंतर चोरट्यांनी मोबाइल क्रमांक बंद केले. पोलीस निरीक्षक हांडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×