Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सराईताला अटक, १७ मोबाईलसह दोन दुचाकी जप्त

सराईताला अटक, १७ मोबाईलसह दोन दुचाकी जप्त

काळेपडळ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरासह ग्रामीण भागात मोबाईलची चोरी करणार्‍या सराईताला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १७ मोबाईल आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने केलेले सहा गुन्हे उघडकीस आले. शंकर गणपत गायकवाड (रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चोरी झालेल्या मोबाईलच्या अनुषंगाने पोलिस हवालदार प्रतिक लाहीगुडे हे विश्लेषण करून शोध घेत होते. त्यांना मोबाईलचे लोकेशन काळेपडळ पोलिस ठाण्याच्या बाजुस असलेल्या तरवडेवस्तीवर आढळले.

सराईत सुरज ठोंबरेसह दोघांना अटक – सविस्तर बातमी 

संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिस अमंलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, महादेव शिंदे, नितीन ढोले यांनी तरवडेवस्तीवर धाव घेतली. तेथून आरोपी शंकर गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. चौकशी केल्यानंतर तो तरवडेवस्तीत झोपडीमध्ये राहण्यास असल्याचे निदर्शनास आले. तर त्याच्या झोपडीसमोर दोन दुचाकी होत्या. तर एका दुचाकीला एक पिशवी अडकवलेली होती. त्यात पथकाला १७ मोबाईल सापडले. अधिक माहिती घेतली असता झोपडी समोर लावलेल्या दुचाकी चोरीच्या असल्याचे निदर्शनास आले.

आरोपी गायकवाड याने मोबाईल भारती विद्यापीठ, काळेपडळ, समर्थ, भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे निदर्शनास आले. ही कारवाई पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील, गुन्हे निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे, अमंलदार अमर काळंगे, दाऊद सय्यद, अतुल पंधरकर, सद्दाम तांबाळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी बॅटरी चोरालाही ठोकल्या बेड्या

गाड्यांच्या बॅटरी चोरी करणार्‍या शाहिद शरिफ शहा (१९, रा. अनिता हाईट, शिवनेरीनगर, कोंढवा बुद्रुक) याला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. पोलिस अमंलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांना मिळालेल्या माहितीवरून अटक करण्यात आली. त्याला महंमदवाडी येथील लावण्य हॉटेल जवळून चोरीची बॅटरी विकताना पकडले. त्याच्याकडे अधिक केलेल्या चौकशीत चार गाडीच्या बॅटर्‍या व एक मोपेड दुचाकी जप्त असा १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×