Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पुणे पोलीस मुख्यालयात महागणेशोत्सवाचा जल्लोष

डॉग शो, मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला असून उत्सव महागणेशोत्सव म्हणून साजरा होत आहे. या अनोख्या उत्सवाचे वैभव गुरुवारी (दि. २८) पोलीस मुख्यालयात रंगलेल्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांतून खुलून आले. साऊंड–लाईट शोने सजलेल्या दालनात डॉग शोतील प्रशिक्षित श्वानांची चपळ खेळी, पोलीस बॅण्डचे सुरेल सूर आणि शिवकालीन मर्दानी खेळांच्या थरारक प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.

पुणे पोलीस मुख्यालयात महागणेशोत्सवाचा जल्लोष

अखिल मंडईचे शारदा गजानन कृष्णकुंजमध्ये झाले विराजमान – सविस्तर बातमी

कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पोलीस कुटुंबिय आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस मुख्यालयात ‘मिशन परिवर्तन’ तर्फे गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्यांचे प्रदर्शन आणि शिवकालीन शस्त्रांचे दर्शन घडविण्यात आले. विविध उपक्रमांतून पर्यावरणपूरक व शिस्तबद्ध गणेशोत्सवाचा संदेश देत भाविकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. पोलीस दलाच्या सादरीकरणात उमटलेला उत्साह आणि कुटुंबियांच्या आनंदमिश्रित उपस्थितीमुळे पोलीस मुख्यालयाचा परिसर उत्सवाच्या रंगांनी उजळून गेला.

महागणेशोत्सवातील विशेषत

– साऊंड आणि लाईट डिस्प्ले, डॉग शो

– पाईप बॅण्ड व पोलीस बॅण्डची सादरीकरणे,

– शिवकालीन मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×