छायाचित्रकारांनी टिपलेल्या क्षणचित्रांचे प्रदर्शन पाहून पोलीस आयुक्त गेले भारावून
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध दैनिकात कार्यरत असणाऱ्या छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन पुणे फेस्टिवल आणि श्रमिक पत्रकार संघ पुणे यांच्यावतीने बालगंधर्व कलादालनात आयोजित केले आहे. त्याचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. यावेळी पुणे फेस्टिवलचे प्रमुख उद्योजक कृष्णकुमार गोयल, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सचिव मंगेश फल्ले ,पुणे फेस्टिव्हलचे सचिन आडेकर, श्रीकांत कांबळे यांच्यासह सर्व दैनिकतील छायाचित्रकार आणि पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे पोलीस मुख्यालयात महागणेशोत्सवाचा जल्लोष – सविस्तर बातमी
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बारकाईने छायाचित्रांचे निरीक्षण केले. संपूर्ण प्रदर्शन बघण्याचा आनंद घेतला. प्रदर्शनात सुमारे ३०० फोटो फ्रेम लावण्यात आल्या आहे. पुणे शहरातील विविध ठिकाणी वार्तांकनासाठी गेलेल्या छायाचित्रकारांनी टिपलेल्या क्षणचित्रांचे प्रदर्शन पाहून पोलीस आयुक्त भारावून गेले. हा उपक्रम अतिशय चांगला असून दरवर्षी असे प्रदर्शन पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून आयोजित गेले पाहिले. शहरातील दररोजच्या धावपळीच्या जीवनातील अत्यंत सूक्ष्म बारकावे मला बघायला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.























