मार्केटयार्ड पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – दुचाकी चोरणार्या सराईताला मार्केटयार्ड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चोरीच्या ४ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, गुन्हे उघडकीस आले आहेत. अनिल गणेश बिरादार ( वय २५, रा. महादेव कॉलनी, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दि. २४ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मार्केटयार्ड पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत होते. त्यावेळी पोलिस अमंलदार दत्तात्रय राऊत यांना संशयीत चोर दुचाकी घेऊन जात असताना दिसला.
पुणे पोलीस आयुक्तांकडून प्रेस फोटोग्राफरांची वाहवा – सविस्तर बातमी
मार्केटयार्ड पोलिस ठाण्याचे तपास पथक अधिकारी उपनिरीक्षक सुनिल भापकर यांना माहिती दिली. संशयित दुचाकी चालकाला अडवून पथकाने त्याची चौकशी करत असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला पकडून त्याची चौकशी करण्यात आली. त्याने मार्केटयार्ड येथील पार्कींग मधून दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर त्याने पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आणखी ३ गाड्या चोरी केल्याचे सांगितले. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांया मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिषा पाटील, पोलिस अमंलदार दत्ता राऊत, राजेश थोरात, कौस्तुभ जाधव, महेश जेधे, किरण जाधव, नितीन झेंड, आशिष यादव यांच्या पथकाने केली.























