Breking News
व्यावसायिकाच्या फ्लॅटमधून ५ लाखांचे दागिने चोरीलाPune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हे

बाळकृष्ण आगाशे यांचे निधन

वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

marathinews24.com

पुणे – सागर सहानी अपहरण प्रकरणासह अनेक गंभीर गुन्ह्याचा छडा लावणारे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील निवृत्त पोलीस अधिकारी बाळकृष्ण आगाशे (वय ७५) यांचे दीर्घ आजाराने झाले. बाळकृष्ण आगाशे हे पोलीस दलात १९७२ मध्ये शिपाई म्हणून रूजू झाले होते. त्यानंतर त्यांची १९८४ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली़ लष्कर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना त्यांची कारकीर्द गाजली होती.

जांभुळवाडी भंगार मालाच्या गोदामाला आग – सविस्तर बातमी

आपल्याबरोबर काही पोलिसांना घेऊन दररोज दोन तास पोलीस ठाण्याच्या परिसरात पायी गस्त घालून नागरिकांशी थेट संवाद साधत असत. आगाशे हे पुणे शहर पोलीस दलात खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक होते. या काळात खंडणीसाठीचे अपहरणाचे २० ते २२ गुन्हे दाखल झाले होते. खंडणीचे सर्व गुन्हे त्यांनी उघडकीस आणून आरोपींना अटक केली होती. ते राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) येथे नियुक्तीस होते. पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आगाशे यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक, तसेच पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह मिळाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×