Breking News
गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली

बसप्रवासात महिलेचे १ लाखांचे मंगळसूत्र चोरीला

प्रवासी महिलांकडील ३ लाखांचे दागिने चोरी

पुणे महानगरपालिका स्थानकात घडली घटना

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बस प्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाखांचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना २६ ऑगस्टला संध्याकाळी सहा ते सातच्या सुमारास पुणे महानगरपालिका स्थानकात घडली आहे. याप्रकरणी चिंचवडमध्ये राहणार्‍या ४६ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात प्रियकराने प्रियेसीवर केला पिस्तुलातून गोळीबार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला चिंचवड परिसरात राहायला असून, २६ ऑगस्टला संध्याकाळी सहाच्या सुमारास पुणे महानगरपालिके जवळील पीएमपीएल बसस्थानकात थांबली होती. आकुर्डीच्या दिशेने जाणारी बस आल्यानंतर महिला बसमध्ये प्रवेश करीत होती. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन महिलेच्या गळ्यातील १ लाखांचे मंगळसूत्र चोरून नेले. बसमध्ये शिरल्यानंतर महिलेला गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी बसमधून उतरून शिवाजीगनर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार रोमाडे तपास करीत आहेत.

दुकानातील ९० हजारांची रोकड चोरीला

दोन दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ९० हजारांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना २७ ते २८ ऑगस्ट कालावधीत बाणेरमधील एन अ‍ॅण्ड एम डिझायनर स्टुडिओ आणि अपोलो फार्मसी मेडीकलमध्ये घडली आहे. याप्रकरणी बाणेरमध्ये राहणार्‍या महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बाणेरमध्ये राहायला असून, २७ ऑगस्टला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या एन अ‍ॅण्ड एम डिझायनर स्टुडिओचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील ८२ हजारांची रोकड चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी अपोलो फार्मसी मेडीकलचे शटर तोडून ८ हजार ६६१ रूपयांची रोकड चोरून नेली. दुसर्‍या दिवशी दुकानांमध्ये चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×