Breking News
Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

पुण्यात प्रियकराने प्रियेसीवर केला पिस्तुलातून गोळीबार

प्रार्थनेतून कर्करोग बरा करण्याचा दावा

प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्याचा राग, बाणेरमधील घटनेने खळबळ

marathinews24.com

पुणे – प्रेमसंबंधाचा ब्रेकअप झाल्यामुळे संतापलेल्या प्रियकराने पिस्तुलातून प्रेयसीच्या दिशेने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बाणेर भागात घडली. शुक्रवारी (दि. २९) सकाळी दहाच्या सुमारास कंपनीच्या आवारात घडली. मात्र, गोळी न सुटल्यामुळे तरुणी थोडक्यात बचावली आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमय मुंढे, बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

दोन एसटी बसमध्ये भीषण अपघात; १२ जण जखमी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ‘एमबीए’ अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असून, बाणेर भागातील खासगी कंपनीत प्रशिक्षण घेते. शुक्रवारी (दि.२९) सकाळी दहाच्या सुमारास ती कंपनीत निघाली होती. त्यावेळी आरोपी प्रियकराने तिला इमारतीच्या आवारात अडविले. त्याने ‘डिलिव्हरी बॉय’सारखा वेश परिधान केला होता. तरुणीला अडविल्यानंतर त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने बोलण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्याकडील पिस्तुलातून तरुणीच्या दिशेने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुलातून गोळीबार झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रियकर हल्ला करण्याच्या तयारीत असताना घाबरल्यामुळे तिने आरडाओरडा केला. तिचा आरडाओरडा ऐकल्यानंतर कंपनीतील कर्मचारी, सुरक्षारक्षकांनी धाव घेतली.

आरोपीविरुद्ध यापुर्वी खूनाचा प्रयत्नाचा गुन्हा

गोळीबारानंतर आरोपी दुचाकीवरुन पसार झाला असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली होती. दरम्यान, आरोपी एका खासगी कंपनीत काम करतो. यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवडमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गोळीबाराची घटना घडलेल्या संबंधित कंपनीचे कार्यालय जुन्या इमारतीत आहे. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसून, पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.

हल्लेखोराने तरूणीवर पिस्तूलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळी न सुटल्यामुळे धोका टळला. आरोपीच्या शोधार्थ तपास पथके रवाना केली आहे. त्याचे छायाचित्र सीसीटीव्हीत कैद झाले असून, त्याला शोधले जात आहे. – सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×