Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

दोन एसटी बसमध्ये भीषण अपघात; १२ जण जखमी

मुळशी तालुक्यात चाचवली येथे अपघात

marathinews24.com

मुळशी – ब्रेक फेल झाल्याने चालकाने बस रस्त्याच्या उजव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चिंचवडहून खेड (रायगड) कडे जाणारी दुसरी एसटी बस समोरून आल्याने झालेल्या अपघातात १२ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि.२९) सकाळी नऊच्या सुमारास वाजता मुळशी तालुक्यातील चाचवली गावाजवळ घडला आहे.

बाळकृष्ण आगाशे यांचे निधन – सविस्तर बातमी

दोन एसटी बसमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघातात १२ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, पौड येथे उपचार सुरू आहेत. श्रीवर्धनकडून बीडकडे जाणारी एसटी बस (क्रमांक एम एच ०६ बी डब्लू ७९८५) गाडीचा अचानक ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाने बस रस्त्याच्या उजव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चिंचवडहून खेड (रायगड) कडे जाणारी दुसरी एसटी बस (क्रमांक एम एच १४ इ ३२८३) समोरून येत होती. त्यामुळे दोन्ही बसांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर प्रवाशांमध्ये आरडाओरड झाली. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, पौड येथे दाखल केले.

एसटी अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
अपघाताबाबत स्थानिक पोलीस आणि एसटी प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला असून पुढील यो कारवाई करण्यात येत आहे. घटनास्थळी नागरिक, पोलिसांनी मदतकार्य राबवून प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता दाखवली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×