स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. कृष्णा देवीदास एकंडे (वय २५, रा. ध्रुता गाव, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावणार्या चोरट्यांना अटक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकंडे यांची ओळख झाली होती. आरोपीने तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले होते. विवाहाच्या आमिषाने त्याने तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने तरुणीला धमकावले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शिरसाट तपास करत आहेत.
तरुणीला अश्लील संदेश पाठविणाऱ्याविरुद्ध गुन्हा
तरुणीला अश्लील संदेश पाठविणाऱ्या एकाविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी योगेश राजेंद्र धनवडे (वय ३८, रा. गदेवाडी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणीचा समाज माध्यमातील मोबाइल क्रमांक (इन्स्टाग्राम) बदलून तिच्या समाज माध्यमातील खात्यात तांत्रिक फेरफार केले. आरोपीने तरुणीला अश्लील संदेश पाठविण्यास सुरुवात केली. आरोपीच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.
पीएमपी वाहक महिलेचा विनयभंग
पीएमपी वाहक महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका प्रवाशाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हडपसर भागात ही घटना घडली. याबाबत वाहक महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विजयकुमार उद्धवराव हारकाळ (वय ३२, रा. खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पीएमपी वाहक आहे. आरोपी हारकळ याने प्रवासी तिकिटावरुन वाहक महिलेशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली, तसेच विनयभंग केला. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच विनयभंग केल्या प्रकरणी हारकळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक शिकलगार तपास करत आहेत.




















