Breking News
राज्यातील पहिल्या महसूल लोक अदालतीचे उद्घाटनशेतजमिनीशी निगडित प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लोकअदालतीचे आयोजन करा-महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेमुद्रांक शुल्क अभय योजनेस मुदतवाढीबाबत प्रस्ताव सादर करा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभहवेत शस्त्रे फिरवून आम्हीच इथले भाई म्हणत घातला राडादिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येरवडा येथील शासकीय संस्थेत मोफत प्रवेशमाजी सैनिकांनी नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणीचे अवाहनलघुउद्योजक प्रशिक्षण मेळाव्याचे १३ जून रोजी आयोजनछळाला कंटाळून महिलेने इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्यापुण्यात एटीएम मशीनमध्ये छेडछाड, सराईत टोळीचा पर्दापाश

पीएसआय पद मिळवून देण्याचे आश्वासन देत १० लाखांचा गंडा..

पीएसआय म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत १० लाखांना फसवले

Marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र पोलीस खात्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत एकाने १० लाखांना फसवले. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाने दिलेल्या
फिर्यादीवरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महादेव बाबूराव दराडे (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे.

शेतकऱ्याकडून घेतली १ लाखाची लाच – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दराडेने २२ वर्षीय तरुणाला पीएसआय पदावर नोकरीला लावतो असे आमिष दाखवले. त्यासाठी १ मे २०२२ ते ४ मार्च २०२४ या कालावधीत आरोपीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तरुणाकडून वेळोवेळी १० लाख रुपये घेतले. पैसे घेऊनही पीएसआयची नोकरी लागत नसल्याने आणि दिलेले पैसे दराडे परत करत नसल्याने तक्रारदाराने पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. याप्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट दोन लचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top