Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्ह्यात राजीनामा सत्र सुरू

स्वामी चिंचोली (ता. दौंड) ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी माजी चेअरमन, संचालक राजीनामा देणार

marathinews24.com

पुणे – मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता थेट राजीनाम्यांची साथ मिळत आहे. मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वामी चिंचोली ( ता. दौंड ) विकास सेवा सोसायटीचे संचालक रामचंद्र मधुकर शेंद्रे, सीताराम ननवरे यांच्यासह माजी चेअरमन संभाजी काळे, ग्रामपंचायत सदस्य प्रा.धनाजी मत्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. शासकीय कामकाजाच्या वेळेत सोमवारी (दि.१) संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

व्यवसायातून उन्नती साधूया.. जीवनाचा उत्कर्ष घडवूया – सविस्तर बातमी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता गावोगावी विविध मार्गाने नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला जात आहे. मागण्या मान्य न झाल्यास काही ठिकाणी आंदोलने सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता सोसायटी पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनाम्यांचा मार्ग स्वीकारला आहे. यामुळे आरक्षण चळवळीला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे. शासनाने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात, आम्हालाही न्याय मिळवून द्यावा, आरक्षण संदर्भात ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

चिंचोली विकास सेवा सोसायटीचा मी संचालक असून, मराठा ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी (दि.१) सप्टेंबरला सकाळी सचिवाकडे माझा संचालक पदाचा राजीनामा देणार आहे. चिंचोलीतील सर्व सोसायटी सभासदांनी मला निवडून दिले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. रामचंद्र शेंद्रे, विकास सेवा सोसायटी सदस्य, स्वामी चिंचोली

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×