Breking News
“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेखजिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्या

‘दगडूशेठ’ बाप्पाला १३३ लीटर आईस्क्रीमचा नैवेद्य

१३३ वर्षपूर्तीनिमित्त १३३ लिटर आईस्क्रीमचा नैवेद्य

marathinews24.com

पुणे – तब्बल १३३ लिटर फ्रेश दूध… नॅचरल ऑरेंज पल्प व त्यामधील संत्र्याच्या सालींचा क्रश वापरून तयार केलेले १३३ लिटर संत्र्याच्या आईस्क्रीमचा नैवेद्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दाखविण्यात आला. पुण्यातील सुप्रसिद्ध किगा आईस्क्रीम च्या वतीने हा नैवेद्य अर्पण करून तो प्रसाद भाविकांना देण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने यंदा १३३ व्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून त्या १३३ वर्षपूर्तीनिमित्त १३३ लिटर आईस्क्रीमचा नैवेद्य किगा आईस्क्रीम च्या वतीने दाखविण्यात आला. यावेळी किगा आईस्क्रीमचे संचालक किरण सुरेश साळुंखे आणि गणेश राजेंद्र गोसावी यांसह ट्रस्टचे विश्वस्त, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपक्रमाचे ५ वे वर्ष होते.

मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्ह्यात राजीनामा सत्र सुरू – सविस्तर बातमी

गणेश गोसावी म्हणाले, साधारण आठ दिवसांमध्ये तापमानाचे प्रमाण साधत आपण संत्र्याच्या आकाराचे म्हणजेच गोलाकार स्वरूपाचे आईस्क्रीम तयार केले. हा आकार बनवत असताना आम्हाला कोल्ड स्टोरेज मध्ये उणे १८ ते २४ तापमानामध्ये थोड्या थोड्या कालावधीमध्ये जाऊन त्याला आकार देणे व तसेच त्याला व्यवस्थितपणे हाताळणे या गोष्टींच्या अडचणी येत होत्या. पण त्यावर मात करून हा छानसा महाप्रसाद आमच्याकडून तयार झाला आणि दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हा नैवेद्य बाप्पांना अर्पण करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×