Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

‘गजानना तू’ काव्यसंग्रहात शास्त्र आणि कलेची सांगड-स्मिता महाजन

डॉ. ज्योती रहाळकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन

marathinews24.com

पुणे – ‘गजानना तू’ या काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेत शास्त्र आणि कला यांची उत्तम सांगड साधली आहे. तत्त्वज्ञान, पंचमहाभुते, निसर्गाची महती विषयीचा सांगोपांग विचार संवेदनशील मनाच्या कवयित्रीने मांडला आहे. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेला गेयता, मधुर शब्द लाभले असून त्या सादरीकरणासाठी देखील पोषक आहेत, असे विचार ज्येष्ठ नृत्यगुरू स्मिता महाजन यांनी व्यक्त केले.

‘दगडूशेठ’ बाप्पाला १३३ लीटर आईस्क्रीमचा नैवेद्य – सविस्तर बातमी

सिग्नेट प्रकाशनतर्फे डॉ. ज्योती रहाळकर लिखित ‘गजानना तू’ या कविता संग्रहाचे आणि ‘कबीर वाणी’ पुस्तिकेचे प्रकाशन रविवारी (दि. ३१) स्मिता महाजन आणि आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी महाजन बोलत होत्या. डॉ. जयेश रहाळकर मंचावर होते. डॉ. रहाळकर्स हेल्थकेअर अँड प्रेगकेअर, कोथरूड येथे कार्यक्रम झाला.

स्मिता महाजन म्हणाल्या, डॉ. ज्योती रहाळकर यांचे व्यक्तिमत्व अत्यंत गुणी असून त्यांच्या मनात येणारे तरल, संवेदनाक्षम विचार त्या कवितेतून प्रकट करीत असतात. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, स्वत:ला आनंदीत ठेवण्यासाठी तसेच वेगळेपण दर्शविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सतत काहीतरी कर्म करत राहणे आवश्यक आहे. डॉ. ज्योती रहाळकर यांची बैठक वाङ्‌मयीन विचारांची व अभ्यासाची आहे. त्यांचे व्यक्तिमत्व हरहुन्नरी असून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रासह साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे.

लेखनाविषयी बोलताना डॉ. ज्योती रहाळकर म्हणाल्या, मी गेली अनेक वर्षे प्रसंगानुरूप काव्य करत आहे. माझ्या हातून अनेक पुस्तकांचे अनुवाद घडले आहेत. गणेशोत्सवानिमित्त मी केलेल्या गणेशावरील कवितांच्या संग्रहाचे प्रकाशन करण्याचा योग जुळून आला आहे. मला आजेसासुबाईंचा लाभलेला मऊ सहवास स्मरणात ठेवून त्यांच्या स्मृतींना हे पुस्तक अर्पण करीत आहे.

सुरुवातीस ऋचा खरे यांनी भरतनाट्यम् नृत्याद्वारे गणेशवंदना सादर केली. पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटणाऱ्या डॉ. सानिका मोडक यांचा विशेष सत्कार स्मिता महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरुजा रहाळकर यांनी केले तर आभार डॉ. जयेश रहाळकर यांनी मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×