Breking News
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे बिरसा मुंडा यांना आदरांजली…केंद्रीय राज्य मंत्र्याची अशीही संवेदनशीलता…बस प्रवासादरम्यान चोऱ्या करणाऱ्या दोन महिलांना अटकतब्बल ३६ तोळे दागिने तक्रारदारांना केले परतउपमुख्यमंत्री यांच्या हस्ते श्याम दौंडकर लिखित धडपड भाग-३ या पुस्तकाचे प्रकाशनराज्यातील पहिल्या महसूल लोक अदालतीचे उद्घाटनशेतजमिनीशी निगडित प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लोकअदालतीचे आयोजन करा-महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेमुद्रांक शुल्क अभय योजनेस मुदतवाढीबाबत प्रस्ताव सादर करा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभहवेत शस्त्रे फिरवून आम्हीच इथले भाई म्हणत घातला राडा

परदेशी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

परदेशी चलनात नफा मिळवून देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार, विमानतळ पोलिसांकडून एकाला अटक

Marathinews24.com

पुणे – परदेशी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. याबाबत तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, शाहिद मुबारक तांबाेळी (वय ३६, रा. मनीष पार्क, कौसरबाग, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहिद तांबाेळी आणि पीडित तरुणीची ऑक्टोबर २०२४ मध्ये ओळख झाली होती. त्यावेळी त्याने तरुणीला परदेशी चलनात गुंतवणुकीचे (फाॅरेक्स ट्रेडिंग) आमिष दाखविले होते. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून त्याने तरुणीला जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तरुणीवर बलात्कार केला. याप्रकाराची वाच्यता केल्यास आई आणि भावाला जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच सोशल मीडियावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली. तांबोळीच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने नुकतीच विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तांबाेळीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top