अग्निशमक दलाच्या जवानांनी शोधला मृतदेह
marathinews24.com
पुणे – पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताडीवाला रोड परिसरातील नदीपात्रमध्ये घडली. ३ दिवसांनी तरुणाचा मृतदेह शोधून काढण्यात अग्निशमक दलाला यश आले आहे. ही घटना शनिवारी (दि. ३०) ताडीवाला रोड परिसरात संध्याकाळी घडली होती. राहुल सूर्यकांत हावडे (वय २४ ) असे बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे.
पुण्यात सिमेंट मिक्सर वाहनाने दोघा दुचाकीस्वारांना चिरडले – सविस्तर बातमी
अग्निशमक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल हावडे हा तरुण शनिवारी (दि.३१) ताडीवाला रोड परिसरातील नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, वाहत्या पाण्यात तो बुडाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली. त्यानुसार नायडू अग्निशामक केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाल. नदीपात्रामध्ये बोटीच्या साह्याने शोध मागील तीन दिवस शोधमोहिम राबविण्यात आली. अग्निशमक दल केंद्रातील जवानांसह ड्रायव्हरांनी ताडीवाला रोड ते मांजरी बंधार्यापर्यंत शोध घेतला. सहायक विभागीय अधिकारी विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ भगवान वायकर निलेश लोणकर, दत्तात्रेय सातव, सर्व तांडेल ड्रायव्हर फायरमन यांनी तीन दिवस अहोरात्र प्रयत्न केले. मुंढवा ब्रिजखाली सोमवारी( दि.१) सायंकाळी पाच वाजता हावडेचा मृतदेह मिळून आला.




















