Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पुण्यात सिमेंट मिक्सर वाहनाने दोघा दुचाकीस्वारांना चिरडले

मंतरवाडी चौकातील शेल पेट्रोल पंपाजवळील घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव सिमेंट मिक्सर वाहनाखाली आलेल्या दुचाकीस्वारासह सहप्रवाशी तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि. १) सकाळच्या सुमारास मंतरवाडी चौकातील शेल पेट्रोल पंपाजवळ घडला. अपघातानंतर परिसरात वाहतूककोंडी झाली होती. संतोष प्रल्हाद कांबळे (वय ३९, रा. कवडगाव, अहिल्यानगर) आणि सुदर्शन गोरख पुलावळे (वय ३८, रा. उरूळी देवाची) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. सिमेंट मिक्सर वाहन चालक नागेश नाना कोरके (वय ३०, रा. उपळाई बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

रंगकाम करताना तोल गेला, १४ व्या मजल्यावरून पडल्याने मजूर ठार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार संतोष अणि सुदर्शन हे सोमवारी (दि.१) त्यांच्या दुचाकीवरून कामासाठी प्रवास करीत होते. त्यावेळी हांडेवाडी चौकाकडून सासवडच्या दिशेने जात असताना दुचाकीस्वार दोघेही भरधाव दुचाकी सिमेंट मिक्सर वाहनाच्या खाली येऊन चिरडले. त्यातच दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाती माहिती मिळाल्यानंतर फुरसुुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त दोघांना ससून रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, सिमेंट मिक्सरवरील चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. अपघातातील सिमेंट मिक्सर वाहनामधून सिमेंट वाहुन नेले जात होते. त्यावेळी भरधाव दुचाकी आणि संबंधित वाहनाचा अपघात झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती फुरसुुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली.

पार्किंगच्या वादातून डोक्यात खुर्ची मारली

पार्किंगच्या वादातून तरूणाच्या डोक्यात खुर्ची मारून जखमी केल्याचा प्रकार ३१ ऑगस्टला दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास वडगावशेरी येथील ब्रम्हासन सिटी सोसायटीच्या कार्यालयात घडला. याप्रकरणी राजेश प्रताप शिर्के (६०) आणि संग्राम प्रताप शिर्के (रा. ब्रम्हासन सिटी, वडगाव शेरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नागेंद्रकुमार नरेंद्रकुमार रामपुरिया (वय ४२, रा. ब्रम्हासन सिटी, वडगावशेरी) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार आणि आरोपी एकाच सोसायटीत राहण्यास आहेत. दोघांमध्ये पार्कींगच्या वादातून भांडणे झाले. भांडणातून दोघांनी रामपुरियाच्या डोक्यात खुर्ची मारून त्यांना जखमी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×