Breking News
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबीराला पुण्यात प्रारंभपुण्यात नक्षलवादी कमांडर हिडमा माडवीच्या गाण्यावर नाचमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ संपन्नपंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटनदेऊळ बंद २” च्या पोस्टरने जिंकली प्रेक्षकांची मनेपुण्यात एमडी ड्रग्जची विक्री रॅकेट उघडकीसप्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यामाध्यमातून गर्भवती महिलांना मोठा दिलासाबसच्या धडकेत तरूण ठार, पिसोळीतील घटनासंयुक्त जयंती महोत्सव 2026 : बोपोडीत भीमगीतांनी रंगली सांस्कृतिक मैफल

रंगकाम करताना तोल गेला, १४ व्या मजल्यावरून पडल्याने मजूर ठार

खासगी कंपनीतील कामगाराकडून रोकड चोरी

सिंहगड रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – रंगकाम करताना इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून तोल गेल्यामुळे खाली पडून मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना ३१ ऑगस्टला सकाळी नउच्या सुमारास सिंहगड रस्ता परिसरातील विठ्ठलवाडी कमानीजवळील स्कायडेल डी विंग इमारतीच्या क्लब हाउसच्या कामावेळी घडली आहे. कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेतल्याप्रकरणी ठेकेदाराविरूद्ध सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोबुद मारूफ हसन (वय ३४ रा. गणेशपूर, तुळशीपूर, बलरामपूर, उत्तर प्रदेश) असे ठार झालेल्या मजूराचे नाव आहे.

विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार, धमकावून २ लाख रुपये उकळले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील विठ्ठलवाडी कमानीजवळील स्कायडेल डी विंग इमारतीच्या क्लब हाउसचे काम सुरू होते. त्याठिकाणी ३१ ऑगस्टला सकाळी नउच्या सुमारास मोबुद रंगकाम करीत होता. त्यावेळी १४ व्या मजल्यावरून पडल्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, कामगारांच्या सुरक्षिततेत हलगर्जीपणा बाळगल्याप्रकरणी ठेकेदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. अडागळे तपास करीत आहेत.

रेटींग देण्याच्या नावाखाली ऑनलाईन लुट

हॉटेलला रेटींग देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तरूणाला ३ लाख २७ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना २६ मे ते ७ जून कालावधीत धायरीत घडली आहे. याप्रकरणी ४० वर्षीय तरूणाने नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धायरी परिसरात राहायला असून, २६ मे रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. त्यांच्या हॉटेलला रेटींग देण्यासह ट्रेडींग केल्यावर काही प्रमाणात नफा देउन त्यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांना विविध कारणे सांगून ३ लाख २७ हजार रूपये वर्ग करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×