विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार, धमकावून २ लाख रुपये उकळले

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

खराडी पोलिसांकडून गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विवाह विषयक संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. सोशल मीडियावर छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेकडून २ लाख रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी एकाविरुद्ध खराडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
अमित गंगाधर शेंडगे (रा. पारगाव, जि. सोलापूर) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्वारगेट, सातारा रस्त्यावर दोघांचे मोबाइल हिसकावले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी शेंडगे यांची गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विवाह विषयक संकेतस्थळावरुन ओळख झाली होती. शेंडगेने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर तो महिलेला भेटण्यासाठी पुण्यात आला. हाॅटेलमध्ये महिलेला नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला, तसेच तिची छायाचित्रे त्याने मोबाइलवर काढली. त्यानंतर शेंडगेने महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. हाॅटेलमध्ये काढलेली छायाचित्रे महिलेचे नातेवाईक आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून २ लाख रुपये उकळले. महिलेने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने विवाहाबाबत विचारणा केल्यास विषारी ओैषध पिऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने नुकतीच खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बलात्कार, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक मोनाली भदे तपास करत आहेत.

कोंढव्यात भरदिवसा घरफोडी

कोंढवा भागात एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार येवलेवाडी रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदाराचे कुटुंबीय शनिवारी (३० ऑगस्ट) सकाळी साडेअकराच्या सुमारास सदनिका बंद कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दागिने आणि रोकड असा एक लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तासाभरानंतर कुटुंबीय घरी परतले. तेव्हा सदनिकेच्या दरवाज्याचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

किराणा दुकानातून तेलाचे डब्बे चोरी

किराणा माल दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी तेलाचे डब्बे चोरून नेल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत किराणा माल विक्रेत्याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचे सिंहगड रस्त्यावरील दत्तवाडी परिसरात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील तेलाचे चार डब्बे चोरून चोरटे पसार झाले. दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने रविवारी (३१ ऑगस्ट) पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरलेल्या चार डब्ब्यांची किंमत आठ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×