स्वारगेट, सातारा रस्त्यावर दोघांचे मोबाइल हिसकावले

भरदिवसा सराफाची दागिन्याची बॅग पळवली

स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला. स्वारगेट आणि पुणे-सातारा रस्त्यावरील शंकरमहाराज उड्डाणपूल परिसरात दोघांचे मोबाइल हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या.

टोळक्याकडून लष्करी जवानाला धक्काबुक्की – सविस्तर बातमी

स्वारगेट भागातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ महाविद्यालयीन तरुणाचा मोबाइल चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारादर तरुण शिवाजीनगर भागातील दीपबंगला चौकात एका खासगी वसतिगृहात राहायला आहे. तो शनिवारी (३० ऑगस्ट) सकाळी सव्वादहाच्या सुमारास लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरातनू निघाला होता. त्या वेळी चोरट्यांनी त्याच्यकडील २५ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. तरुणाने आरडाओरडा केला. दुचाकीस्वार चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

पुणे – सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलाजवळ एका महिलेच्या हातातील ४० हजारांचा मोबाइल चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला धनकवडी भागात राहायला आहेत. त्या शनिवारी रात्री दहाच्या सुमारास शंकर महाराज उड्डाणपूल परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या हातातील महागडा मोबाइल हिसकावून नेला. पोलीस हवालदार अमोल पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×