टोळक्याकडून लष्करी जवानाला धक्काबुक्की

येरवडा पोलिसांकडून ५ जण अटकेत

marathinews24.com

पुणे – भरधाव वेगात दुचाकी चालविणाऱ्या टोळक्याला विचारणा केल्याने लष्करी जवानाशी अरेरावी करून धक्काबुक्की करण्याची घटना येरवडा भागात घडली. मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांशी अरेरावी करून त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तरुणीसह ५ जणांना अटक केली.
याप्रकरणी ज्ञानेश्वर सुंदर नटकले (वय २६), राहुल संजय साळवे (वय २३), रोहित अशोक डोंगरे (वय २७, रा. भीमनगर, विश्रांतवाडी), हर्षल भोसले (वय २५, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांच्यासह एका तरुणीला अटक केली. याबाबत लष्करी जवानाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एसआरए’ प्रकल्पात तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी जवान आणि सहकारी दुचाकीवरून शनिवारी (३० ऑगस्ट) पहाटे तीनच्या सुमारास येरवडा भागातून निघाले होते. त्या वेळी वेगवेगळ्या दुचाकीवरून भरधाव वेगात नटकले, साळवे, डोंगरे, भोसले निघाले होते. तक्रारदार लष्करी जवानाने त्यांना दुचाकी भरधाव वेगात चालवू नका, असे सांगितले. या कारणावरून आरोपींनी लष्करी जवानाशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली. जवान आणि सहकाऱ्याला अडवून त्याच्या गळ्यातील चांदीची साखळी, मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. लष्करी जवानाला जिवे मारण्याची धमकी दिली. येरवड्यातील जेल रोड पोलीस चौकीपासून काही अंतरावर हा प्रकार सुरू होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस चौकीतील दोन पोलीस कर्मचारी तेथे गेले. त्यांनी टोळक्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणणे, धक्काबुक्की प्रकरणी ५ जणांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×