एसआरए’ प्रकल्पात तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू

पर्वती दर्शन भागातील घटना; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – नियोजित झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील (एसआरए) इमारततीत काम करताना तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. बांधकाम मजुरास सुरक्षाविषयक साधने न पुरवून दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी ठेकेदारासह दोघांविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गेंदमाई रघुराई साकेत (वय २९, मूळ रा. कुचवाही, जि. सिधी, मध्य प्रदेश ) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत साकेत याच्या भावाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठेकेदारासह सुरक्षाविषयक पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

खराडीतील उच्चभ्रु सोसायटीतील जुगार अड्ड्यावर छापा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती दर्शन भागातील एका झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. साकेत शनिवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी इमारतीत तिसऱ्या मजल्यावर काम करत होता. त्या वेळी तोल जाऊन पडल्याने लिफ्टच्या मोकळ्या जागेत पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. साकेतला सुरक्षाविषयक साधने न पुरविणे, तसेच दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कोपनर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×