Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

तरुणाच्या त्रासामुळे विवाहितेची आत्महत्या

Pune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्न

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – तरुणाच्या त्रासामुळे एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणासह त्याच्या पत्नीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तरुणीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी पंकज रवींद्र पाटील, त्याची पत्नी रुपाली (दोघे रा. गोडबोले वस्ती, मांजरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात प्रेयसीवर गोळीबार करणारा प्रियकर गजाआड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहापूर्वी आत्महत्या केलेल्या तरुणीची आरोपी पंकज पाटील याच्याशी ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. विवाहानंतर तरुणीने त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध तोडले होते. पाटीलने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणीच्या पतीच्या मोबाइल क्रमांकावर पाटीलने तरुणीबरोबर काढलेली छायाचित्रे पाठविली. या घटनेनंतर तरुणी मानसिक तणावाखाली होती. पाटील आणि त्याच्या पत्नीच्या त्रासामुळे तरुणीने नुकतीच गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीच्या आईने नुकतीच याबाबत तक्रार दिली. त्यानंतर पाटील आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत तपास करत आहेत.

खराडीतील उच्चभ्रु सोसायटीतील जुगार अड्ड्यावर छापा – घर मालकासह २६ जणांविरुद्ध गुन्हा

पुणे – शहरातील खराडी भागातील उच्चभ्रु साेसायटीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत पत्ते, तसेच अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी सदनिका मालकासह २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

खराडीतील एका उच्चभ्रु सोसायटीतील सदनिकेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. सदनिकेत टेबल-खुर्च्या टाकून जुगार अड्डा चालविण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथून २४ जणांना ताब्यात घेतले. जुगार अड्डा चालविण्यासाठी दोघांनी सदनिका दिल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी सदनिका मालकासह महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गु्न्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली. आरोपींकडून पत्ते, जुगार खेळण्यासाठी वापरले जाणरे प्लास्टिक काॅईन जप्त करण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंढे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वजीत जगताप, सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे, उपनिरीक्षक राहुल कोळपे, गणेश घुले, श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, सुरेंद्र साबळे, श्रीकांत कोद्रे, सूरज जाधव, जयवंत श्रीरामे, विकास केदारी, वर्षा कर्डीले यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×