Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

तडीपारीचा आदेश भंग केला, दोघा गुंडांना पकडले

सहकारनगर पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातून तडीपार केलेले असतानाही संबंधित आदेशाचा भंग करणार्‍या दोन सराइतांना सहकारनगर पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजू नवनाथ कांबळे (वय २१, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संजय म्हस्के यांनी फिर्याद दिली आहे. तळजाई वसाहत परिसरात शनिवारी (३० ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास राजू कांबळे हा आला होता. कांबळेला पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार केले होतेत. तो शहरात आल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

पोहण्यासाठी गेलेला तरूण बुडाला, ३ दिवसांनी मृतदेह आढळला – सविस्तर बातमी

शहरात तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सराइत अथर्व रवींद्र अडसुळ (वय २१, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) याला तळजाई वसाहत परिसरात शनिवारी सायंकाळी ताब्यात घेतले. पोलीस कर्मचारी सुदाम बागलाने यांंनी याबाबत फिर्याद दिली आहे. दरम्यान, गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराइतांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात येते. अनेक सराइत तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करुन शहरात येतात. गणेशोत्सवात पोलिसांनी सराइतांच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. तडीपार गुंड आढळून आल्यास त्वरीत नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×