Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन

पुण्यात छत्रपती संभाजी उद्यान ते शनिवार पेठ जोडणारा पादचारी पुलाचे उद्घाटन

marathinews24.com

पुणे – मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. पादचारी पुलाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि आदर्श असून हा स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. पुलामुळे पेठेतील नागरिकांना मेट्रोने प्रवास करण्याची चांगली सुविधा निर्माण झाली आहे, असे यावेळी फडणवीस म्हणाले. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूलचे लोकार्पण – सविस्तर बातमी

पुणे मेट्रोच्‍या टप्पा १ अंतर्गत वनाझ स्थानक ते रामवाडी मार्गादरम्यान डेक्कन जिमखाना आणि छत्रपती संभाजी उद्यानाला पेठ भागाशी जोडण्यासाठी दोन पुलांचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी छत्रपती संभाजी उद्यान ते शनिवार पेठ या पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पुलामुळे मुठा नदीच्या पलिकडे शनिवार पेठ, नारायण पेठ आणि परिसरातील नागरिकांना छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकात येणे सुलभ होणार आहे.

भारतातील पहिला ७० डिग्री कललेला काँक्रीटचा पायलन या पुलामध्ये आहे. उच्च तणावक्षमता असलेल्या २० केबल्स पुलाचा भार उचलण्यासाठी बसविण्यात आला आहे. पुलाची एकूण लांबी १७९. ७९१ मीटर तर रुंदी ८ मीटर आहे. या पुलाची रचना अत्याधुनिक ‘केबल स्टेड ब्रिज’ या तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आली आहे. पुलासाठी नदीपात्रात केवळ दोन खांब उभारण्यात आल्याने नदीच्या प्रवाहाला अडथळा होणार नाही. पादचारी पुलाजवळ बालगंधर्व रंगमंदिर असल्याने पुण्याच्या सांस्कृतिक वारशाला अनुसरून पुलाची रचना तानपुऱ्यासारखी करण्यात आली आहे. पुलामध्ये अभियांत्रिकी आणि कलेचा उत्तम संगम साधण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×