Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

मराठा आंदोलनकर्त्यांच्या सोयी-सुविधांसाठी माजी अधिकारी मैदानात

माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांनी घेतली मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट

marathinews24.com

पुणे – मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालयांची व्यवस्था, आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी देशमुख यांनी केली. आंदोलनाचा व्याप वाढत असल्याने मोठ्या संख्येने नागरिक मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि सार्वजनिक सोयी यांचा प्रश्न गंभीर होत असल्याचे देशमुख यांनी अधोरेखित केले.

ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजचा मल्हार मार्तंड कार्यक्रम उत्साहात

आढावा बैठकीत आंदोलकांची सद्यस्थिती, त्यांची गरज तसेच मोर्चादरम्यान उद्भवू शकणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.बैठकीत विकास पासलकर, ॲड. आशिषराजे गायकवाड, ॲड. डुबे पाटील, ॲड. टेकाळे, सौरभ मोरे यांच्यासह इतर मराठा समन्वयक उपस्थित होते. आंदोलकांना आवश्यक सुविधा पुरविल्या गेल्यास आंदोलन शांततेत आणि संयमाने पार पडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×