Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

पुण्यात गुरुवार पेठेतील सोसायटीत आग

पुण्यात गुरुवार पेठेतील सोसायटीत आग

रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले- अग्निशमन दलाची तत्परता

marathinews24.com

पुणे – शहरातील गुरुवार पेठेतील सोसायटीत पहाटे आग लागली.तळमजल्यावर असलेल्या वीज मीटर , तसेच दुचाकींनी पेट घेतल्याने सोसायटीत मोठ्या प्रमाणावर धूर झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सोसायटीतील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले.

पुण्यात अमली पदार्थ खरेदी व्यवहार अंगलट – सविस्तर बातमी 

गुरुवार पेठेत झेबा शेल्टर्स सोसायटीतील तळ मजल्यावर बुधवारी (३ सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास वीज मीटर, तसेच दुचाकींनी पेट घेतला. सोसायटीतील रहिवासी गाढ झोपेत होते. तळमजल्यावर दुचाकी, वीज मीटरला आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला. आग भडकल्याने रहिवासी घाबरले. त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन दहा ते पंधरा मिनिटात आग आटोक्यात आणली.

सोसायटीत मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने रहिवासी घाबरले होते. जवानांनी सोसायटीतील ४६ रहिवाशांना बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही. शाॅर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवान अतुल मोहिते, अजिम शेख, सुधीर नवले, तेजस पटेल, सागर शिर्के, यश वीरकर यांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

पेटता दिवा पडल्याने सदनिकेत आग

नऱ्हे भागातील सोसायटीतील सदनिकेत गणपतीच्या मूर्तीसमोर लावलेला पेटता दिवा पडल्याने आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सदनिकेत अडकलेल्या एका ज्येष्ठ महिलेची सुटका केली. नऱ्हे भागातील कॅनाॅल रस्त्यावरील सुंदर संस्कृती सोसायटीतील सदनिकेत गणेशोत्सवानिमित्त सजावट केली होती. सदनिकेत कुमुद बरसावले (वय ७०) एकट्या होत्या. दिवा पडल्याने सजावटीचे साहित्य पेटले. सदनिकेत मोठ्या प्रमाणावर धूर झाला. या घटनेची माहिती मिळताच नऱ्हे अग्निशमन केंद्रातील जवान नरेश पांगारे, गोगावले, नितीन भोवड, आकाश शिंदे यांनी धाव घेतली. सोसायटीतील अग्निशमन यंत्रणेचा वापर करुन सदनिकेतील आग आटोक्यात आणली. आगीमुळे सजावट साहित्य जळाले. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर जवान तेथून रवाना झाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×