Breking News
पुण्यातील मंदिरांना मिळणार नवी ओळखशेतकरी कर्जमुक्तीसाठी नैसर्गिक शेती अभियान ठरत आहे मैलाचा दगडअटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूकपुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझरबळीराजाला मोठा दिलासा; शेतीकामासाठी माती, मुरूमावरील रॉयल्टी रद्दराज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागूनाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी करा

पीएमपीएल प्रवासी महिलांचे दीड लाखांचे दागिने लांबविले

पीएमपीएल प्रवासी महिलांचे दीड लाखांचे दागिने लांबविले

नगर रस्ता, विश्रांतवाडी, खडकी परिसरात घडल्या घटना

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल प्रवासी महिलांकडील दागिने लांबविण्याचे सत्र सुरू आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत प्रवासी महिलांकडील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. नगर रस्ता, विश्रांतवाडी, खडकी परिसरात घटना घडल्या. नगर रस्त्यावर पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांची साेनसाखळी चोरट्यांनी लांबविली. याबाबत एका ज्येष्ट महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला चंदननगर भागातील विडी कामगार वसाहतीत राहायला आहेत. त्या ३१ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास पीएमपी बसने नगर रस्त्यावरुन प्रवास करत होत्या.

पुण्यात दोन ठिकाणी टोळक्याकडून वाहनांची तोडफोड – सविस्तर बातमी 

बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली. पोलीस कर्मचारी विशाल निलख तपास करत आहेत. ३१ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर ते विश्रांतवाडी मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या हातातील ३० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी कापून नेल्याची घटना घडली. ज्येष्ठ महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.तक्रारदार मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटच्या रहिवासी आहेत. बस प्रवासात चोरट्यांनी सोन्याची बांगडी कटरचा वापर करुन लांबविली.

मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी एसटी स्थानकासमोर पीएमपी थांब्यावर बसमध्ये प्रवेश करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ५६ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस कर्मचारी हेमंत वाघमारे तपास करत आहेत.

स्वारगेट एसटी स्थानकात मोबाइल हिसकावला

स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी तरुणाचा मोबाइल संच चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कोथरूड भागात राहायला आहेत. तो बाहेरगावी निघाला होता. एसटी बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी तरुणाच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×